दस्त नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा वापरा

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे आवाहन

पुणे  -दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी नोंदणी विभागाने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कार्यालयात ताटकळत उभे राहू लागू नये, यासाठी ऑनलाइन आगाऊ वेळ घेऊन कार्यालयात यावे. 

नागरिकांनी नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणीसाठी पब्लिक डेटा एंट्रीद्वारे (पीडीई) डाटा एंट्री करणे बंधनकारक आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबवल्याचे सांगण्यात आले.

नोंदणी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. नागरिकांनी दस्तांवर स्वाक्षरी घरी किंवा कार्यालयाबाहेरच करावी. प्रत्येक व्यक्तीने स्वत:चे पेन आणणे, एकच पेन अनेकांनी वापरू नये. आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्कशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

सद्यःस्थितीत दस्त नोंदणीसाठी शहरात सकाळ व दुपार दोन सत्रांत कार्यालये सुरू आहेत. त्याऐवजी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच सकाळी 9. 45 मिनिटे ते सायंकाळी 6.15 मिनिटे या वेळेत सुरू राहतील. याशिवाय या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरू राहणार आहे.

वेळ आरक्षित करून ठेवा
नागरिकांनी डेटा एंट्री करून दस्त नोंदणीसाठी नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर ई-स्टेप-इन या प्रणालीद्वारे उपलब्ध सोईची वेळ आगाऊ बुक करावी किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आगाऊ वेळ आरक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही, नोंदणी विभागाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.