मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी घरे निर्माण करताना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने “प्री-फेब’ या नावीन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिले.
“प्री-फेब’ या नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात मंत्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात तंत्रज्ञांनी म्हाडामध्ये अधिकारी व विकासक यांच्यासमोर तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण करावे. म्हाडाने या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पथदर्शी प्रकल्प राबवावा असे निर्देशही आव्हाड यांनी यावेळी दिले.