– संदीप घोडके
येरवडा (प्रतिनिधी) – प्रादेशिक परिवहन कार्यालय आळंदी रस्ता फुलेनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रोलर ब्रेक टेस्टर या यंत्रणेचा लोकार्पण सोहळा बुधवारी आहे.
त्यामुळे फुले नगर येथील आरटीओ कार्यालयाची साफ सफाईच्या काम युध्दपातळीवर सुरु आहे. पालिकेचे कर्मचारी येथील परीसर स्वच्छ करीत होते.
बुधवारच्या या कार्यक्रमासाठी येथील वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजुला लावली जात होती.
तर येथील प्रवेशद्वारावर पेंटिंगचे कामे सुरु होती. लोकार्पण सोहळ्यासाठी कोनशिला उभारण्याचे कामही सुरु होते.
मात्र याचवेळी, ज्या जेंटिंग मशिनने पालिकेची स्वच्छतागृहे स्वच्छ करावयाची असतात त्या मशिनने येथील धुळखात असलेली वाहने स्वच्छ करण्याचे काम सुरु असल्याचे निर्दशनास आले आहे.
ज्या कामासाठी मशिनचा उपयोग करावयाचा त्यासाठी या मशिनचा उपयोग केला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे प्रशासन याची दखल घेणार हा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.