संसद अधिवेशन रोखण्यासाठीच पेगॅससचा वापर; मनोहर खट्टर यांची कॉंग्रेस, ‘वायर’वर टीका

चंदीगढ  – संसदेचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज रोखण्यासाठी पेगॅसस फोन टॅपिंग प्रकरणाचा वापर कॉंग्रेस आणि द वायर प्रयत्न करत असल्याची टीका हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज केली.

पत्रकारांशी बोलताना खट्टर म्हणाले, महिला, तरूण आणि मागासवर्गीयांसाठी या अधिवेशनात आम्हाला विविध योजनांवर चर्चा घडवायची होती, मात्र जर काही चांगले होण्याची शक्‍यता असेल तर कॉंग्रेस काही शक्‍तींसोबत अधिवेशनाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करते.

या विवादाच्या वेळेचा उल्लेख करत खट्टर म्हणाले, त्यांनी (कॉंग्रेस) वेळ निश्‍चित केलेली असते. जेव्हा चर्चा करण्यासारखे काही मुद्दे त्यांच्याकडे नसतात, त्यावेळी ते अशा क्‍लृप्त्या वापरतात. परकीय शक्तींसोबत संधान साधून कट रचतात.

द वायर हे डाव्यांनी पाठिंबा दिलेले माध्यम आहे. पेगॅससचा कट 18 जुलैला समोर आला. संसदेच्या अधिवेशनाच्या फक्त एक दिवस आधी हा प्रकार घडला. वायर हे डाव्यांचे प्रकाशन आहे आणि डाव्यांशी संबंधित आहे, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.