सुरक्षा दलावर हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांकडून ‘मशीनगन’, ‘ग्रेनेड लॉंचर’ आणि ‘देशी रॉकेट’चा वापर; सरकारकडून गंभीर दखल

विजापूर – माओवाद्यांनी छत्तिसगढमधील विजापूर येथे सुरक्षा दलावर हल्ला करण्यासाठी लाईट मशिन गन्स आणि अंडर बॅरेल ग्रेनेड लॉंचर आणि देशी रॉकेटचा वापर केला होता, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या मोहीमेत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील इत्यंभुत माहिती दिली आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दलाचे महासंचालक कुलदीपसिंग यांनी 23 जनांची हत्या झाली. त्यात सीआरपीएफच्या जवनांचाही समावेश असल्याचे सांगितले. ते म्हणाले, यातील बहुतांश जण एलमजीने केलेल्या गोळीबारात मरण पावले आहेत.

फोर्स कमांडरने मला दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी ही एलएमजी लपवून ठेवली होती. त्यातून गोळीबार करण्यात आला आनि नक्षलवादी अन्यत्र सुरक्षित ठिकाणी लपून बसले होते. युबीजीएल आणि देशी रॉकेट इत्यादीचा वापर यापुर्वीही करण्यात आला होता. मात्र यंदा त्याची तीव्रता अधिक व्यापक होती. आमचे जवान शूरपणे लढले. नलवाद्यांनी त्यांच्या मृत आणि जखमी साथिदारांना तीन ट्रॅक्‍टरमधून नेले. त्यामुळे त्यांची जीवीतहानी किती झाली असेल, याची आपण कल्पना करू शकता, असे सिंग यांनी सांगितले.

एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांनी सुरवातील तोफगोळे आणि गोळ्यांचा मारा केला. त्यात आमचे काही कर्मचारी जखमी झाले होते. त्यावेळी पोझिशन घेत असणाऱ्या आमचे सहकारी त्यांना सुरक्षित स्थळी नेत असताना त्यांच्यावर लाईट मशिनगनधून गोळीबार करण्यात आला. त्यात डीआरजी आणि कोब्राच्या जवानांना मोठ्यासंख्येने हानी झाली, असे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

जंगलातून सुरक्षा दले मागे घ्यावीत आणि त्यासाठी मोठ्या संख्येने जिवीतहानी घडवायची या दुहेरी हेतूने हा हल्ला घडवण्यात आला असावा. या भागात तेकुलगुडेम गावाच्या परिसरात नक्षलींचा कमांडर आला आहे, याची पक्की खबर आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आही शोध मोहीम राबवण्यास सुरवात केली, असे छत्तिसगढचे पोलिस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी सांगितले.

माहिती पेरली का?
गुप्तचरे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवादी उपस्थित होते ही दिलेली माहिती खरी होती. मात्र, सुरक्षा दलांना तेथे येण्यासाठी भाग पाडण्यासाठी ही माहिती पेरण्यात आली होती का? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र नक्षली कामांडर हिडमा त्या भागात उपस्थित होता हे नक्की.

350 माओवादी तुटून पडले
या चकमकीत बचावलेल्या एका अधिकारुयाने दिलेल्या माहितीनुसार, 350 सशस्त्र माओवादी आणि त्यामचे 250 सहानुभुतीदार कोब्रा, डिआरजी आणि एसटीएफच्या 400 जणांच्या पथकावर तुटून पडले. माओवाद्यांचीही जीवितहानी झाली आहे. या चकमकीत ठार झालेली एक महिला नक्षलवादी ही कमांडर असावी कारण ती इन्सास रायफल वापरत होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.