करोना विषाणूंचा शस्त्र म्हणून वापर

इसिसचा कट; पुन्हा दहशतवादी हल्ल्यांची शक्‍यता

नवी दिल्ली – करोना साथीच्या काळात दहशतवादी संघटना आपल्या विचारांचा प्रसार आणि निधी संकलानात गुंतल्या आहेत. करोनामुळे लादलेले निर्बंध उठल्यानंतर दहशतवादी संघटना पुन्हा हल्ला करण्याची शक्‍यता आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रेच्या अहवालात देण्यात आला आहे. करोना विषाणूंचा वापर शस्त्र म्हणून करण्याचा कट इसिसने आखला होता, असेही या अहवालात म्हटले आहे.

करोनामुळे जागतिक मंदीची स्थिती आली आहे. त्यातच दहशतवादाला रोखण्यासाठी करावयाच्या खर्चाची डोकेदुखी त्यामुळे वाढणार आहे. लॉकडाऊनच्या काळात इसिसने आपला संभाव्य दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. अनेक देशांतून त्यांनी ही मोहीम राबवली होती.

करोनाच्या लॉकडाऊनचा इसिस, अल कायदा आणि त्यांच्या संबंधित संघटनांच्या कामकाजावर संघर्ष क्षेत्र आणि संघर्ष सुरू नसलेल्या क्षेत्रात झालेला परिणाम वेगवेगळा आहे. साथीमुळे सैन्याचे अन्यत्र लक्ष वेधले गेल्याचा फायदा दहशतवादी संघटना उठवत आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठी संघर्ष क्षेत्रात निर्बंध लादले गेले नाहीत. त्यामुळे तेथे दहशतवादी कृत्यांची शक्‍यता वाढली असून संघर्षहीन क्षेत्रात ती कमी झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

करोना विषाणूचा शस्त्र म्हणून वापर करायची योजना इसिसने आखली होती. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. असा वापर झाल्याचे कोणत्याही देशाने म्हटले नाही. इसिस आणि अल कायदा सारख्या संघटना अन्य संघटनांकडून केल्या जाणाऱ्या प्रचारचा आधार घेत असतात, असे या अहवालात म्हटले आहे.

करोनामुळे आंतराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लादले असल्याने दहशतवादी संघटनांच्या निधी पुरवठ्यावर निर्बंध आले आहेत. त्याचबरोबर त्यांची हालचाल आणि जाळे विस्तारण्यावरही मर्यादा आल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने दसहशतवादी कृत्ये करण्यास फार वाव राहिला नाही असे त्यात म्हटले आहे.

करोनाचा जल्लोष करा
करोनाच्या भीतीमुळे इसिसचा प्रसार फारसा प्रभावी राहिला नाही.इसिसने शत्रू कमजोर असताना त्यावे हल्ला चढवण्याचे आदेश दिले दिले होते. त्याच बरोबत करोना हा पाश्‍चिमात्यांना मिळालेली शिक्षा आहे. त्याचा जल्लोष करा असे आवाहन केले होते. मात्र त्याला फार प्रतिसाद मिळाला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.