सीरियाकडून रासायनिक अस्त्रांचा वापर

द हेग (नेदरलॅन्ड) – सीरियाच्या सैन्याकडून अलीकडेच रासायनिक अस्त्रांचा वापर केला गेला असल्याचा आरोप “ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स’ अर्थात “ओपीसीडब्लू’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या निरीक्षक गटाने केला आहे. सीरियाच्या लष्कराने साकिब या शहराशेजारील अल ताहिल इथे क्‍लोरीन गॅसचा सिलेंडर टाकला होता. मात्र त्यामुळे कोणीही ठार झाले नाही, असे या निरीक्षक गटाने म्हटले आहे.

सीरियाकडून क्‍लोरीन बॉम्बचा वापर फेब्रुवारी 2018 मध्ये रहिवासी भागात झाला असल्याचे ठामपणे म्हणता येऊ शकते, असे या गटाने म्हटले आहे. या आरोपांबाबत सीरिया सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. सीरिया आणि सीरियाचा पाठीराखा असलेल्या रशियाने रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचे आरोप सतत फेटाळले आहेत.

या क्‍लोरीन सिलेंडर 4 स्फोटात कोणीही ठार झाले नाही, मात्र डझनभर लोक जखमी झाल्याचे “ओपीसीडब्ल्यू’ने म्हटले आहे. क्‍लोरिन गॅस पसरल्याने छातीत जळजळ होणे, डोळ्यांची आग, दृष्टीहीता, श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि चक्कर येण्यासारखी लक्षणे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. क्‍लोरीन हे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घातलेले रसायन नाही. मात्र रासायनिक शास्त्रांमध्ये त्याचा वापर करण्यावर 1997 च्या ठरावा अंतर्गत बंदी घालण्यात आलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.