तुमचे विंडोज सॉफ्टवेअर बनावट आहे की अस्सल? असे ओळखा

अनलायसन्स्ड सॉफ्टवेअरचा वापर ही सर्वसामान्य चूक

जेन्युइन विंडोज १० सॉफ्टवेअरसह स्मॉल आणि मीडियम बिझनेसेस राहू शकतात संरक्षित. सध्याची हायब्रिड (संमिश्र) कार्यपद्धती व्यवसायांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासाची फेररचना करून अधिक गतिमानता आणण्यास मदत करत आहे. त्याचवेळी आजच्या इंटरकनेक्टेड जगात सायबर सिक्युरिटीशी निगडित आव्हानेही तितकीच खरी आहेत.

नव्या किंवा “ब्रिंग युअर ओन” (बीवायओ) कनेक्टेड डिव्हाइसेसच्या माऱ्यापासून आपल्या संघटनांचाच कसा बचाव करायचा, याचा व्यवसायांनी विचार करण्याची गरज आहे. भारतीय व्यवसायांना जागतिक सरासरीच्या तुलनेत रॅनसमवेअरचा १८० टक्के अधिक, मालवेअरचा ७९ टक्के अधिक, क्रिप्टोकरन्सी मायनिंगचा ३०० टक्के अधिक आणि ड्राइव्ह बाय डाऊनलोड हल्ल्याचा ११ टक्के अधिक धोका आहे.

अनलायसन्स्ड सॉफ्टवेअरचा वापर ही सर्वसामान्य चूक असून व्यवसायांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये व्हायरसेस असू शकतात, तसेच अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे उपकरणे सायबर थ्रेट्सला बळी पडू शकतात. या धोक्यांमध्ये आयडेंटिटी थेफ्ट, क्रेडिट कार्ड किंवा बँक डिटेल्सची चोरी, डाटा लॉस, व्यवसायात अडथळे आणि भौतिक किंवा लौकिकाला धक्का पोहोचणे अशा अनेक धोक्यांचा समावेश आहे. छोट्या व्यवसायांसाठी जेन्युइन सॉफ्टवेअर खरेदी करणे काहीसे अडचणीचे असू शकते, पण पुढील सोप्या उपायांनी तुम्ही योग्य मार्गावर राहू शकता :

संरक्षित राहाण्याचे ७ मार्ग
बनावट वस्तू बनवणाऱ्यांचे बळी बनण्यापासून वाचण्यासाठी जेन्युइन सॉफ्टवेअर खरेदी करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा :

विश्वासार्ह विक्रेते आणि सॉफ्टवेअर रिसेलर्सकडूनच खरेदी करा :
सॉफ्टवेअर खरेदी करताना ते विश्वासार्ह स्त्रोताकडून मिळत आहे, याची खातरजमा करा. विश्वासार्ह रिसेलर किंवा अधिकृत ऑनलाइन स्टोअर हे सर्वोत्तम पर्याय आहेत.

केवळ लायसन्स्ड सॉफ्टवेअरचा वापर करा :
अधिकृत विंडोज असो वा ऑफिस, ते योग्यरित्या लायसन्स्ड सॉफ्टवेअरच आहे, याची खात्री करा.

स्वप्नवत वाटणाऱ्या किमतींपासून सावध राहा :
सवलती आणि स्वस्त सॉफ्टवेअर पॅकेजेसच्या सापळ्यात अडकू नका. गमावलेला डाटा पुन्हा मिळवण्यासाठी किंवा बनावट सॉफ्टवेअरच्या संदर्भात कायदेशीर बाबींवर तुम्हाला कितीतरी अधिकपटीने खर्च करण्याची वेळ येऊ शकते.

प्रॉडक्ट की सोर्स तपासून घ्या :
डिजिटल डाऊनलोडसाठी प्रॉडक्ट की विश्वासार्ह विक्रेते आणि सॉफ्टवेअर रिसेलरकडून प्राप्त होत आहे, अनोळखी ऑनलाइन फोरम अथवा खातरजमा न झालेल्या ईमेलवरून नाही, याची खबरदारी घ्या

प्रत्यक्ष दुकानातून खरेदी करत असाल तर पॅकेजिंगची पुन्हा पुन्हा खात्री करून घ्या :
उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्ये ऑथेंटिक लोगो, होलोग्राम आणि ब्रँड नेम आहे, याची खातरजमा करा. योग्य पॅकेजिंगविना असलेल्या स्टँडअलोन प्रॉडक्ट की कार्ड्सपासून सावधगिरी बाळगा. ते मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरचा वापर करण्याचे अधिकार बहाल करत नाहीत.

उत्पादनाचे पॅकेजिंग आधीच उघडलेल्या अवस्थेत नाही ना, याची खात्री करा :
उत्पादनाचा प्रथमच वापर होत आहे, याची खातरजमा करण्यासाठी ऑथेंटिक, नव्या उत्पादनाचे पॅकिजिंग नेहमीच सीलबंद असते.

अद्ययावत राहा :
सॉफ्टवेअर नियमित स्वरुपात अद्ययावत केल्यास संभाव्य हॅकर्स आणि व्हायरसेसपासून सुरक्षित राहाण्यास तुम्हाला मदत मिळते.

बनावट ओळखायचे कसे?
चोरीच्या आणि बनावट सॉफ्टवेअरच्या निर्मितीत आणि वितरणात गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. तुम्ही खरेदी करत असलेले सॉफ्टवेअर जेन्युइन आहे, हे ओळखण्यासाठी तीन ‘पी’ लक्षात ठेवा,

पॅकेजिंग : प्रॉडक्ट पॅकेजिंगचे बारकाईने निरीक्षण करा. जेन्युइन प्रॉडक्टच्या पॅकेजिंगवरील अक्षरे धूसर नसतील, स्पेलिंगच्या चुका नसतील आणि लोगोही चुकीचे नसतील.

प्रॉडक्ट ऑथेंटिसिटी : डाऊनलोडचे बटण दाबायच्या आधी वेबसाइटचा स्त्रोत तपासून पहा, ऑक्शन साइट्स टाळा आणि पीअर टु पीअर फाइल शेअरिंग साइट्सही टाळा.

प्रॉडक्ट लेबल : जेन्युइन मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरसमवेत नेहमी ऑथेंटिसिटी लेबलचे प्रमाणपत्र, एम्बेडेड होलोग्राम आणि २५ अक्षरांची युनिक प्रॉडक्ट की असते. कुठलेही मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर खरेदी करताना शहाणे व्हा आणि या तिन्ही ‘पी’ची खातरजमा करा.

संकटात असताना :
बनावट मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फसवणूक झालेले ग्राहक microsoft.com येथे काउंटरफिट सॉफ्टवेअर रिपोर्ट दाखल करू शकतात आणि सॉफ्टवेअरबाबत आणि ते कुठे खरेदी केले किंवा कुठे उपलब्ध आहे, याबाबतची माहितीही देऊ शकतात.  बनावट सॉफ्टवेअर विकणाऱ्यांच्या विरोधात योग्य कारवाई करता यावी, यासाठी तुमची देण्यास बंधनकारक नसलेली व्यक्तिगत माहिती देण्याचीही विनंती केली जाऊ शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.