सैन्याच्या कामगिरीचा मतांसाठी वापर : माजी सैन्य अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र?

नवी दिल्ली – निवडणूक प्रचारामध्ये भारतीय सैन्याच्या कामगिरीचे श्रेयाच्या प्रकाणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे श्रेय राजकारण्यांनी घेतल्याने  १५० पेक्षा अधिक माजी सैनिकांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहले आहे. परंतु आता या मुद्यांवरून वाद निर्माण होताना दिसत आहे. या पत्रात समाविष्ट असणाऱ्या काही माजी सैनिकांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हंटले आहे.

सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये, असे आदेश राजकीय पक्षांना देण्यात यावा, असे पत्र देशाच्या तिन्ही दलांच्या ८ माजी प्रमुखांसह १५० पेक्षा अधिक माजी सैनिकांच्या स्वाक्षरी करत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले होते. परंतु, यावर पत्रात समाविष्ट असलेल्या नावांपैकी काही माजी सैन्य अधिकाऱ्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हंटले आहे. तर काही अधिकाऱ्यांनी असे पत्र लिहले असल्याचे स्वीकार केले आहे. मात्र राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनीही अशा आशयाचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पत्रात समाविष्ट असणाऱ्या नावांपैकी रिटायर्ड एयर मार्शल एनसी सूरी यांनी पत्रावर कोणतीही स्वाक्षरी केल्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यांच्याशिवाय जनरल एस.एफ. रोड्रिग्स यांनी म्हंटले कि, हे वृत्त अफवा असून माझे नाव या पत्रात कसे आले माहित नाही. मी माझ्या ४२ वर्षाच्या करियरमध्ये कधीही राजकारणाबद्दल भाष्य केलेले नाही.

तर दुसरीकडे मेजर जनरल हर्ष कक्कड़ यांनी पत्र लिहले असल्याचे म्हंटले आहे. तसेच जनरल शंकर रॉय चौधरी यांनीही वृत्ताला दुजोरा दिला असून राजकीय पक्ष सैन्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असून यामुळे जवानांच्या प्रतिमेला नुकसान होत आहे.

https://twitter.com/ANI/status/1116612274616061952

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)