ब्यूटी प्रॉडक्ट्स काही कालावधीनंतर एक्सपायर होऊन जातात. त्यामुळे ते फेकून दिले जातात. मात्र एक्सपायर झालेल्या ब्युटी प्रोडॅक्टचा इतर कारणासाठी वापर करू शकतात.
लिपस्टिकचे वेगवगळ्या प्रकारचे शेड्स आपल्याकडे असतात मात्र रोजच्या वापरात त्यातील एक किंवा दोनच शेड्सचा वापर होतो. अशावेळी खूप कालावधीपासून न वापरले गेलेले लिपस्टिक वितळवून व्हॅसलीनमध्ये मिक्स करून त्याचा लीपबाम म्हणून वापर करू शकता.
मेकअप ब्रशचा काही कालावधीनंतर हार्ड बनतो. त्यामुळे चेहऱ्यासाठी मेकअप करताना अशा ब्रशचा अजिबात उपयोग होत नाही. मात्र हार्ड झाल्यामुळे हा ब्रश फेकून देण्याऐवजी तुम्ही तो कीबोर्ड, इलेक्ट्रॉनिक गोष्टी किंवा इतर छोट्या छोट्या गोष्टी साफ करण्यासाठी वापरू शकता.
आयशॅडो खराब झाला असेल तर त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारची नेलपॉलिश बनवण्यासाठी करू शकता. एक्स्पायर झालेला फेशिअल टोनर हा क्लिनरप्रमाणे कार्य करू शकतो. घरातील काचा, आरसे, सेंटर टेबल स्वच्छ करण्यासाठी टोनरचा उपयोग होऊ शकतो. काळ्या रंगाच्या जेल आयलाइनर बूट अथवा शूज चमकवण्यासाठी वापर करू शकता.