लंडन : संपूर्ण जगालाच सध्या करोना महामारीने ग्रासून टाकले आहे यापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणे महत्वाचे आहे. ब्रिटनमध्येही महामारीचा प्रभाव असल्याने नागरिक विविध प्रकारचे मास्क वापरत आहेत. मँचेस्टरमध्ये अशाच एका नागरिकाने जिवंत अजगराचा वापर मास्क म्हणून केल्याची बाब समोर अली आहे.
हा नागरिक स्विन्टन आणि मँचेस्टर या दरम्यान एका बसमधून प्रवास करीत होता. पण त्याच्याकडे मास्क नसल्याने त्याने त्याच्याकडे असलेला जिवंत अजगर तोंडाभोवती मास्क म्हणून गुंडाळला. बसमधील इतर प्रवाशांना आधी असे वाटले कि त्या प्रवाशाने गमतीदार मास्क वापरला आहे. पण जेव्हा त्यांना समजले कि तो अजगर जिवंत आहे.
तेव्हा बसमध्ये धावपळ झाली परिवहन अधिकाऱ्यांनी या प्रवाशांवर कोणतीही कारवाई केली नाही पण नागरिकांनी मास्क म्हणून कोणत्याही प्राणाच्या शरीराचा वापर करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ब्रिटनमध्ये करोनाचा प्रभाव वाढत असल्याने मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते.