पारदर्शी मास्क वापरा आणि स्मितहास्य परत मिळवा

गेले सुमारे 14 ते 15 महिने नॉव्हेलकरोनाव्हायरसने धुमाकूळ घातल्याने कोव्हिड-19 आणि नंतर सुधारीत विषाणूने माणसाचे जगणे मुश्‍कील करुन टाकले आहे. नाकावाटे पसरणाऱ्या या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणून चेहऱ्याला मास्क लावणे आणि नाक-तोंड झाकूनच बाहेर पडणे क्रमप्राप्त झाले.
मात्र, सतत मास्क लावल्यानेही अनेकांना श्‍वसनाचे विकार सुरु झाले.

शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर असलेल्या मास्कमुळे माणसांना एकमेकांना ओळखणे फारच अवघड बनले. त्यातून समज आणि गैरसमजही वाढू लागले. मग काही जणांनी फक्त नाकापुरते मास्क लावायला सुरुवात केली तर काही जणांनी फेसशिल्डचा वापर केला.

आता यावर उपाय म्हणून अमेरिकेतील एका कंपनीने पारदर्शी अर्थात ट्रान्सपरन्ट मास्क बाजारात आणले असून या मास्कला मोठी मागणी आहे. ज्याने हा मास्क परिधान केला आहे, त्याचा चेहरा पूर्णपणे व्यवस्थित दिसत असल्याने या मास्कची मागणी वाढली आहे. शिवाय नाक आणि तोंड बंदच रहात असल्याने साथरोगाचा फैलाव होण्याचीही शक्‍यता उरलेली नाही, हे विशेष.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.