करोनापासून संरक्षण करण्यासाठी फेसशिल्ड वापरताय? तर ही बातमी नक्की पहा

मुंबई – करोना संकटकाळात आता सगळी शहरे अनलॉक झाली असल्यामुळे रोज घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. करोना संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझर वापरणे आणि मास्क वापरणे या अत्यावश्यक बाबी बनल्या आहेत.

याबरोबरच अनेक लोक मास्क व्यतिरिक्त ‘प्लास्टिक फेसशिल्ड’चाही वापर करीत असतात. दरम्यान, प्लास्टिक फेसशिल्ड तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे? चला तर, प्लास्टिक फेसशिल्ड बद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.

फेसशिल्ड करोनाला थांबवू शकत नसल्याचे दिसून आले आहे. जपानी सुपरकॉम्प्युटर ‘फुगाकू’ने हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे फेसशिल्ड हे मास्कला पर्याय बनू शकत नाही असे संशोधकांनी म्हटले आहे. जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरपैकी एक असलेल्या ‘फुगाकू’ आहे.

या कॉम्प्युटरनुसार प्लास्टिक फेसशिल्ड हे एअरोसोल्सना पकडण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झालेले नाही. हे फेसशिल्ड करोनापासून पूर्णपणे संरक्षण देऊ शकत नाही. जपान मध्ये नवजात बालकांना सुद्धा फेस शिल्ड लावले जात आहेत. फेसशिल्ड पेक्षा योग्य मास्क अधिक सुरक्षित असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.