2 इंचाने उंची वाढवण्यासाठी त्याने मोजले 55 लाख रुपये!

अमेरिकेतील युवकाने करुन घेतली कॉस्मेटीक सर्जरी

वॉशिंग्टन – आपल्या इच्छापूर्तीसाठी लोक काय करतील आणि किती पैसा ओततील हे कधीच सांगता येत नाही. आपली उंची वाढवण्यासाठी तब्बल 55 लाख रुपये खर्च करणारा अमेरिकेतील हा युवक विरळाच म्हणायला हवा. टेक्‍सास राज्यातील डल्लास येथील अल्फान्सो फोलर्स नामक 28 वर्षीय मेडिकल स्टुडंटने आपली उंची वाढवण्यासाठी कॉस्मॅटीक सर्जरी करुन 5 फूट 11 इंचावरुन 6 फूट 1 इंचापर्यंत मजल मारली आहे.

आपली उंची किमान सहा फूटांपेक्षा उंच असायला हवी, असे फ्लोअर्सचे स्वप्न होते. त्यापायी त्याने हॉर्वर्डमधून बाहेर पडलेले डॉ. केविन डेबिपार्शद यांची मदत घेतली आणि त्यांच्या लास वेगासमधील लिम्बप्लास्ट-एक्‍स या रुग्णालयात ही शस्त्रक्रीया करुन घेतली. मात्र, त्यासाठी फ्लोअर्सने तब्बल 75 हजार डॉलर्स अर्थात 55 लाख रुपये खर्च केले. शिवाय मांडीच्या हाडांची लांबी वाढवून सर्व काही सुरळीत करण्यासाठी आणखी 10 हजार डॉलर्स (80 हजार रुपये) खर्च येण्याची शक्‍यता आहे.

आता फ्लोअर्सच्या मते त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तरिही पूर्णपणे ऍथलिटीक आयुष्य जगण्यासाठी अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागेल, असे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरनी सांगितले आहे. तरिही अशा प्रकारच्या सर्जरीमध्ये सर्वसामान्य दिनक्रम पूर्ण करण्यास सहसा अडचणी येत नाहीत असेही या डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

फ्लोअर्सची ही कृती अनेक युवकांना प्रेरणा देणारी ठरली असल्याने, सोशल मिडीयातून त्याच्यावऱ्‌ आभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.