सईदला शिक्षा : अमेरिकेकडून पाकिस्तानचे अभिनंदन

वॉशिंग्टन : 2008 मध्ये मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफीज सईद याला शिक्षा ठोठावल्याबद्दल अमेरिकेने समाधान व्यक्त केले आहे. पाकिस्तानने आपल्या दहशतावादाच्या विरोधातील भूमिकेकडे जाण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

सईदला 11 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्याचे जाहीर झाल्यानंतर अमेरिकेच्या गृहविभागाने पत्रक काढून पाकिस्तानचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानला फायनान्शीयल ऍक्‍शन टास्क फोर्सच्या बैठकीत काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता होती. त्याआधी चार दिवस सईदला शिक्षा ठोठावण्यात आली.

आपल्या भूमीवरून अन्य देशात दहशतवादी कारवाया करू देणे, आपल्या देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे येथून पुढे ते घडू देणार नाही, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले होते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे सचिव ऍलीस वेल्स यांनी म्हटले आहे. त्या म्हणतात, हाफीजला शिक्षा होणे हे लष्कर ए तोयबाला रोखण्यात आणि पाकिस्तानच्या जागतिक दहशतवादाच्या विरोधातील लढ्याच्या स्थानाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. अमेरिकेने घेतलेली ही भूमिका पाकिस्तानला दिलासा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.