अमेरिकेच्या पथकाला चीनमध्ये “नो एन्ट्री’ 

बीजिंग  – करोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी अमेरिकेच्या तज्ञांचे पथक वुहानला पाठविण्यात येणार होते. मात्र, चीनने अमेरिकेचा या संदर्भातील प्रस्ताव फेटाळला आहे. करोनाच्या प्रसाराला चीनच जबाबदार असल्याचा ठपका संपूर्ण जगाने चीनवर ठेवला आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याने अमेरिकेने या वृत्ताची पडताळणी करण्याचे ठरवले असून, त्यासाठी एक पथक चीनला पाठवण्यात येणार होते.

मात्र, चीनने अमेरिकेच्या या पथकाला वुहानमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग याविषयी म्हणाले, करोना हा सगळ्या जगाचा, संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. तो जगात केव्हाही कुठेही येऊ शकतो. तसाच तो चीनमध्ये आला. करोनाच्या प्रसाराशी चीनचा संबंध नाही. याउलट चीनने कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले.

दरम्यान, कोरोनाच्या फैलावाला चीनला जबाबदार धरत जर्मनीने देशात कोरोनामुळे झालेल्या नुकसानीचे 130 अब्ज युरोचे बिल चीनला पाठविले आहे. जर्मनीच्या या हालचालीने चीनला मोठा धक्का बसला आहे. तसेच आणखीही युरोपियन देश, अशी नुकसानभरपाईची मागणी चीनकडे करणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.