वॉशिंग्टन – चीनला जगात कोणीही मित्र नाही. त्या तुलनेत अमेरिकेला मात्र संपूर्ण जगात अनेक मित्र राष्ट्रे आहेत. त्यामुळे अमेरिकेची क्षमता अधिक आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टीन यांनी म्हटले आहे. संरक्षण विभागाशी संबंधित एका संसदीय उपसमितीपुढे बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, तरीही चीनने अमेरिकेपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी बायडेन प्रशासनाने एक टास्कफोर्स स्थापन केला आहे. हा टास्कफोर्स चीनने निर्माण केलेल्या प्रत्येक क्षेत्रातील आव्हानांवर लक्ष ठेऊन आहे.
चीन आज कितीही आव्हानात्मक स्थितीत असला तरी चीनला संपूर्ण जगात एकही मित्र नाही. त्या तुलनेत अमेरिकेला संपूर्ण जगात अनेक मित्र आहेत. त्यामुळे अमेरिकेची स्थिती चीनपेक्षा अधिक भक्कम आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, मी स्वतः अनेक देशांना भेट देऊन तेथील स्थितीची माहिती घेत आहे. आम्ही मित्र राष्ट्रांची एक मजबूत आघाडी उघडत आहोत, असेही त्यांनी या समितीला सांगितले. त्यात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेह ऑस्टीन यांनी नमूद केले. चीनने सध्या सायबर स्पेसमध्ये मोठीच आक्रमक भूमिका घेतली आहे. पण तेथेही अमेरिका त्यांच्यापेक्षा अधिक वरचढ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.