अमेरिकेच्या यानाने मंगळावर केली पहिली टेस्ट ड्राईव्ह

लॉस एंजील्स – अमेरिकेच्या नासा या अंतरीक्ष संशोधन संस्थेने मंगळावर उतरवलेल्या यानाची तेथे आज पहिली यशस्वी टेस्ट ड्राईव्ह घेण्यात आली. 33मिनीटांच्या अवधीत हे यान त्याच्या मुळ जागेपासून सुमारे 6.5 मीटर दूर गेले. या रोव्हरच्या मार्फत तिथे आता अनेक वैज्ञानिक टेस्ट घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या पहिला टेस्ट ड्राईव्हला महत्व होते.

मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आलेल्या या रोव्हरच्या मोबीलिटीला महत्व आहे. ती चाचणी यशस्वी रित्या पार पाडणे महत्वाचे होते. सुदैवाने ती वैज्ञानिकांच्या अपेक्षेनुसार पार पडल्याने वैज्ञानिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मंगळाच्या पृष्ठ भागावर उतरवण्यात आलेल्या या रोव्हरला सहा चाके आहेत.ती सर्व चाके व्यवस्थित चालू असल्याने ही ड्राईव्ह सिस्टीम अत्यंत उत्तम सुरू असल्याचा आम्हाला अभिमान आणि समाधान आहे असे त्यांच्या वैज्ञानिकांनी सांगतले. हे रोव्हर तेथे अनेक महत्वाचे संशोधन करणार आहे.मंगळाच्या पृष्ठभुमीवर जीवसृष्टीचाहीं ते शोध घेणार आहे.तेथील माती आणि दगडाचेही नमुने या रोव्हर मार्फत घेतले जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.