वॉशिंग्टन – अमेरिकेन अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस मध्ये आज अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (US President Joe Biden hosts biggest Diwali reception ever at White House) या निमित्त व्हाईट हाऊसच्या ईस्ट रूम मध्ये दिवाळी पार्टीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. त्याला दोनशे भारतीय अमेरिकन नागरीकांना निमंत्रित करण्यात आले होते.
In celebration of the Festival of Lights, President Biden and the First Lady hosted a Diwali reception at the White House. pic.twitter.com/3kGqCgEebK
— The White House (@WhiteHouse) October 25, 2022
अमेरिकेतील भारतीय नागरीकांनी दया भाव, प्रेम आणि धैर्याचा मार्ग दाखवत अमेरिकेला प्रकाशाच्या दिशेने नेण्यात महत्वाचे योगदान दिले आहे अशी भावना अमेरिकन अध्यक्षांच्या पत्नी डॉ. जिल बायडेन यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्या काहीं पंक्तीही उधृवत केल्या.
मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकन उपाध्यक्ष कमला हॅरीस याही यावेळी आवर्जून उपस्थित होत्या. उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली. त्यांनी यावेळी आपण भारतात साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणी कथन केल्या. त्यांनी चेन्नाईत आपल्या आजी-आजोबांसमवेत अनेक दिवाळ्या साजऱ्या केल्या आहेत.
व्हिडीओ पहा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
To everyone celebrating the Festival of Lights here in the United States and around the world, happy Diwali! pic.twitter.com/0DPlOaqhMO
— Vice President Kamala Harris (@VP) October 24, 2022
आपल्या मातोश्रींच्या शिकवणूक आणि प्रेरणेमुळेच आपण आज अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर विराजमान होऊ शकलो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.