वॉशिंग्टन – मूळ पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक तहव्वूर राणा याच्या सुटकेला अमेरिकेच्या सरकारने विरोध दर्शवला आहे. तसा रिपोर्ट त्यांनी कॅलिफोर्नियाच्या कोर्टात दाखल केला आहे.
राणाचा मुंबईवर झालेल्या हल्ल्यात हात असल्याचा आरोप भारताने केला असून त्याला भारताने या प्रकरणातील फरारी दहशतवादी घोषित केले आहे. त्याला भारतात आणण्याचा प्रयत्नही भारत सरकारने केला होता.
राणा हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार कोलमन हेडली याचा जवळचा सहकारी आहे. भारताच्या विनंतीनुसार त्याला 10 जून रोजी पुन्हा लॉस एंजल्स येथे अटक करण्यात आली आहे.
राणाला ताब्यात देण्यात यावे अशी अधिकृत विनंती भारत सरकारने अमेरिकन सरकारकडे केली असून त्या संबंधात तेथील कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्याच्या पुढील सुनावणीची तारीख 12 फेब्रुवारी अशी आहे.