वॉशिंग्टन : कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाकडे अमेरिकन गुप्तचर खाते बारकाईने लक्ष ठेवून आहे. या पहाणीशी सबंधीत व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूंचा प्रसार भारतात झाल्यास भयावह परिस्थिती उद्भवू शकते. भारतातील दाट लोकसंख्यमुळे ही साथ पसरल्यास मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, असे म्हटले आहे.
यासाथीत आरोग्य उपमंत्री बाधीत झालेल्या इराणकडेही अमेरिकन गुप्तचरांचे बारकाईने लक्ष आहे. कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये उद्भवलेल्यया परिस्थितीविषयी अमेरिकेला चिंता वाटत आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र राज्यमंत्री माईक पोम्पीओ यांनी म्हटले आहे. इाणकडे या साथीला तोंड देण्यासाठी फारच कमी आयुधे असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचे अमेरिकेचे मत आहे.
अमेरिकन संसदेच्या गुप्तचर समितीला गुप्तचर खात्याकडून याबाबतच्या परिस्थितीचा दररोज आढावा देण्यात येत आहे.