US helicopter crash : होर्मूझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळले; वैमानिक सुरक्षित असल्याचे ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकी लष्कराचे एक हेलिकॉप्टर (US helicopter crash) कोसळले, परंतु या घटनेत हेलिकॉप्टरमधील दोन कर्मचारी जखमी झाले नाहीत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

US helicopter crash : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकी लष्कराचे एक हेलिकॉप्टर (US helicopter crash) कोसळले, परंतु या घटनेत हेलिकॉप्टरमधील दोन कर्मचारी जखमी झाले नाहीत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
या अपघाताचे कारण मंगळवारी सकाळी देखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. सोमवारी रात्री एनबीए फायनल्स पाहिल्यानंतर न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी या अपघाताची कबुली दिली.
अमेरिकी लष्कराचे एक अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर (US helicopter crash) सामुद्रधुनीजवळ अज्ञात कारणाने कोसळले, असे अमेरिकेतल्या माध्यमांनी सर्वप्रथम म्हटले होते. अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकाबंदी केल्यामुळे अमेरिकेच्या सैन्यदलाला मदत पोचवण्यात अपाचे हेलिकॉप्टर महत्वाची भूमिका बजावत आहेत. इराण युद्धादरम्यान इराणी ड्रोन पाडण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने देखील या हेलिकॉप्टरचा वापर केला आहे.
इराणने करार करावा-ट्रम्प
इराणने युद्धबंदी करार त्वरित स्वीकारावा, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी केली आहे. पण या युद्धबंदी कराराबाबत नव्याने आशावाद का वाटतो आहे, याबद्दल त्यांनी कोणताही तपशील दिला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यात प्राथमिक शस्त्रसंधीला सहमती झाल्यापासूनच्या दोन महिन्यांत, युद्धबंदी करार लवकरच होईल असे भाकीत ट्रम्प यांनी वारंवार केले आहे.
आपण एक अतिशय चांगला, मजबूत आणि प्रभावी करार करण्याच्या अगदी जवळ आहोत. पण जर आम्ही पुन्हा बॉम्बफेक केली, तर इराणकडे गमावण्यासारखे काहीच उरणार नाही. पण त्यामुळे पुढील आणखी काही महिने होर्मूझ सामुद्रधुनी खुली होऊ शकणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे (US helicopter crash) अनेक लोक मरतील. असे व्हावे, असे कोणालाही वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाटाघाटींचे प्रयत्न सुरू
पाकिस्तानच्या पुढाकाराने अमेरिका-इराण युद्ध थांबवण्यासाठीच्या वाटाघाटी अजूनही सुरूच आहेत. मात्र अमेरिका आणि इराण दोन्ही बाजूंकडून भूमिका सौम्य केली जात नसल्याने हा करार अद्याप होऊ शकलेला नाही. इराणने आपल्याकडील उच्च संवर्धित युरेनियमचा साठा सोडून द्यावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. पण इराण ते नाकारत असून निर्बंधांमधून सूट देण्याची मागणी करत आहे.
अंतिम करार होण्यापूर्वीच गोठवलेली मालमत्ता परत मिळावी, अशीही त्याची मागणी आहे, जी ट्रम्प यांनी फेटाळली आहे. संभाव्य कराराबाबत ट्रम्प यांनी आतापर्यंत केलेली वक्तव्ये सहमत झालेल्या कलमांच्या विरोधात आहेत आणि अमेरिकेला युद्धविराम किंवा संवाद यांपैकी ककाहीही नको आहे, हेच यातून दिसून येते, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सोमवारी सांगितले.
इस्रायलकडून लेबनॉनमध्ये पुन्हा हल्ल्यांचे इशारे
इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिणेकडील टायर या बंदराच्या शहरातील नागरिकांना तेथून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये ख्रिश्चन वस्तीचाही समावेश आहे. या वस्तीला आतापर्यंत इस्रायलने आपल्या हल्ल्यातून वगळले आहे. टायर शहरातून हिज्बुल्लाहचे सदस्य असल्याचे मानून इस्रायलने गेल्याच आठवड्यात ख्रिश्चन वस्त्यांना इशारा दिला आहे.
इस्रायलने गेल्या दोन आठवड्यात या भागात केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे या भागातील शिया मुस्लिमांनी तेथून पलायन केले आहे. गेल्या आठवड्यातील इशाऱ्यानंतर, तेथे होणारे इस्रायली हल्ले रोखण्यासाठी लेबनॉनने आपले सैन्य टायरच्या ख्रिस्ती वस्तीत तैनात केले आहे. या भागात हिज्बुल्लाहचे सदस्य नाहीत, हे दर्शवण्याचाही लेबनॉनचा प्रयत्न आहे.






