नवी दिल्ली : भारतीय नौसेनेची आता मोठ्या प्रमाणात ताकद वाढणार आहे. कारण लवकरच अमेरिका भारताला हाय अल्टिट्यूड अँटी-सबमरीन वॉरफेअर ‘सोनोबॉय’ पुरवणार आहे. यासाठी $52.8 दशलक्ष किमतीचा करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला आहे. आयएनएस मालप आणि आयएनएस मुल्की या पाणबुडी नाशक युद्धनौका यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. यामुळे आता भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.
कशी आहे ‘सोनोबॉय’?
सोनोबॉयची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते पाणबुडी, युद्धनौका आणि हेलिकॉप्टरमधून प्रक्षेपित केले जाऊ शकते. समुद्रातील शूत्रची सर्व माहिती सोनोबॉय देणार आहे. त्यामुळे नौदलाला अपडेट राहण्यास मदत मिळणार आहे. तीन फूट लांब सोनोबॉयची सोनार प्रणाली हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्याच्या मदतीने ते पाण्याच्या खोलीत असलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधू शकतो. ही प्रणाली दोन प्रकारे कार्य करते. नौदल गरजेनुसार त्याचा वापर करू शकणार आहे.
कशाप्रकारे करणार काम?
सोनोबॉय दोन प्रकारे काम करते. सक्रिय आणि निष्क्रिय. निष्क्रिया मोडमध्ये त्याचा वापर करताना वस्तूचे अंतर आणि दिशा शोधली जाते. तर सक्रिय मोड म्हणजे समोरून येणाऱ्या ध्वनी लहरी शोधणे आहे. त्यात पाणबुडी किंवा इतर वस्तू शोधल्या जातात.सोनोबॉय पाणबुडी, हेलिकॉप्टर आणि युद्धनौकांमधून सोडला जाऊ शकतो. याद्वारे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध करण्याची क्षमता सुधारणार आहे.
चीन, पाकिस्तानला बसणार मोठा धक्का
सोनोबॉयमुळे चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे. यामुळे समुद्रातील भारताची टेहाळणी आणखी मजबूत होईल. शत्रूच्या पाणबुड्या किंवा कोणत्याही हालचालींना आळा घालण्यास मदत होणार आहे.