नवी दिल्ली : अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी मोती बाग भागातील दिल्ली सरकारच्या शाळेला भेट दिली. पारंपरिक वेशभुषेत विद्यार्थी पाहुण्याची आतुरतेने वाट पहात होते. मेलानिया यांच्या स्वागतासाठी सर्वोदय सह- शैक्षणिक उच्च माध्यमिक शाळेचे आवार फुलांनी सजवण्यात आले होते. रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या.
कडक सुरक्षा व्यवस्थेत विद्यार्थी फाटकापाशी पाहुण्यांचय स्वागतासाठी उभे होते. हा आमचे शिक्षक विद्यार्थी आणि दिल्लीकरांसाठी महत्वाचा दिवस आहे भारताने जगला अध्यात्मिक शिकवण दिली आणि त्या येथून आनंदाची शिकवण घेऊन जात आहेत, याचा मला आनंद आहे,असे ट्विट केजरीवाल यांनी केले.
श्वेत साडी आणि घागरा चोळी घातलेल्या मुलींनी त्यांचे स्वागत केले. विविध वाद्यांच्या मंजूळ स्वरांनी ट्रम्प भारावून गेल्या. आमच्या शाळेत तुमचे स्वागत असो. असे ट्विट उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केले आहे.