वॉशिंग्टन – अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन हे पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून ऑस्टिन यांच्या या दौऱ्याकडे बघितले जात आहे.
ऑस्टिन आगोदर जपानच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे ते जपानचे संरक्षण मंत्री यासुकासू यमादा यांच्याशी चर्चा करणार आहेत. नंतर, जपानहून ते सिंगापूरला रवाना होतील, तिथे ते सिंगापूरमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज मध्ये 20 व्या शांग्री-ला डायलॉगमध्ये भाषण करणार आहेत.
आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते भारतात चार दिवसांसाठी येणार आहेत. अमेरिका आणि भारतादरम्यानच्या संरक्षण भागीदारीचे आधुनिकीकरण करण्यासाठी ऑस्टिन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेत्यांची भेट घेतील.