अवघ्या ४८ तासात अमेरिकेने घेतला बदला, इसिसच्या तळांवर ‘ड्रोन स्ट्राइक’

वृत्तसंस्था – अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना ४८ तासांमध्ये धडा शिकवला आहे. इसिसच्या तळांवर आज सकाळी ड्रोननच्या सहाय्याने बॉम्ब हल्ले केले आहे. गुरुवारी काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटात १३ अमेरिकन सैन्यासंह ९५ नागरिकांचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शत्रूला शोधून मारणार असल्याचे सांगितले होते.

अमेरिकन लष्कराने हे हल्ले नानगहर प्रांतामध्ये केले. सुरक्षेच्या कारणांमुळे अमेरिकन नागरिकांना विमानतळांच्या वेगवेगळा प्रवेशद्वारांपासून तात्काळ दूर होण्यास सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. असे एका वृत्तावाहिने यासंदर्भात बातमी प्रकाशीत केली आहे.

अमेरिकी सैन्याच्या जवानांनी एका ISIS-K प्लॅनरच्या विरोधात दहशतवादविरोधी अभियान चालवले जात आहे. इस्लामिक स्टेट खुरासननं काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याने आयएसचे किती नुकसान झाले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नसल्याचे सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी माहिती देताना सांगितले आहे.

गुरुवारी काबूल विमानतळावर आयसिस-के या दहशतवादी संघटनेनं स्फोट घडवून आणला होता. यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांसह शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो जण जखमी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.