वॉशिंग्टन – अमेरिकेत ट्रम्प समर्थकांनी केलेला हिंसाचार आणि कॅपिटॉल परिसरात घातलेल्या धुडगुस प्रकरणाचा जगभरातील सर्वच प्रमुख देशांच्या सरकारांनी आणि नेत्यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. हा प्रकार धक्कादायक, अविश्वसनीय आणि अत्यंत भयंकर असल्याची प्रतिक्रिया अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांनी दिली आहे.
कोटेशन
अमेरिकेच्या संसदेमध्ये झालेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे. जगभरातील लोकशाहीचे रक्षण अमेरिकेकडून केले जाते. त्यामुळे तेथे शांततामय आणि योग्य मार्गाने सत्तेचे हस्तांतरण व्हायला हवे.
– बोरिस जॉन्सन, पंतप्रधान ब्रिटन
कायदेशीर आणि योग्य मार्गाने सत्तेचे हस्तांतरण रोखण्यासाठी केल्या गेलेल्या या हिंसाचाराचे कोणत्याही शब्दात समर्थन करता येऊ शकणार नाही.
– डॉमनिक राब, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री
लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू पाहणाऱ्या थोड्याजणांच्या हिंसाचाराचे आम्ही समर्थन करणार नाही. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. वॉशिंग्टनमध्ये आज जे घडले ते अमेरिकन नाही.
– इमॅन्युएल मॅक्रॉ, अध्यक्ष फ्रान्स
आज अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये जे घडले त्यामुळे अतिशय दुःख झाले. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी आपल्या समर्थकांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन करायला पाहिजे. तसेच लोकशाही प्रक्रियेचा आणि कायद्याचा आदर राखण्याचे आवाहन करायला पाहिजे.
– ऍन्टोनिओ ग्युटरेज, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस
अमेरिकत जे दिसले तो लोकशाहीवरील हल्ला होता. लोकांच्या इच्छेला ओलांडण्यात हिंसा कधीही यशस्वी होणार नाही. अमेरिकेतील लोकशाही अबाधित राहिलीच पाहिजे.
– जस्टीन ट्रुडेउ, पंतप्रधान, कॅनडा
वॉशिंग्टनमधील घटना अतिशय धक्कादायक आहे. लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणूकीच्या निकाला मान राखला जायला पाहिजे.
– नेस स्टोल्टेन्बर्ग, नाटोचे अध्यक्ष
जगाच्या दृष्टीने आज अमेरिकेतील लोकशाहीला धोक्यात आणले गेले आहे. अमेरिकेतील लोकशाही, लोकशाही संस्था आणि कायद्यावरील हल्ला मान्य करता येणार नाही. 3 नोव्हेंबरला झालेल्या निवडणूकांचा आदर राखला जायला हवा.
– जोसेफ बोरेल, युरोपिय संघ विदेश धोरणाचे प्रमुख
अमेरिकेतील घटना अतिशय वेदनादायी आहे. या घरगुती प्रश्नातून अमेरिका लवकरच सामंजस्याने बाहेर पडेल. अमेरिकेत राहणाऱ्या तुर्की नागरिकांनी गर्दीपासून दूर रहावे.
– मेव्हलट कॅव्हुसोग्लू, तुर्कीचे परराष्ट्र मंत्री
हिंसाचाराच्या या कृत्यांचा आम्ही निषेध करतो आणि अमेरिकेतील मोठ्या लोकशाही परंपरेनुसार नव्याने निवडलेल्या प्रशासनाकडे सत्तेचे शांततेत हस्तांतरणाची अपेक्षा आहे,
– स्कॉट मॉरिसन, पंतप्रधान ऑस्ट्रेलिया
हा हिंसाचार अयोग्य आहे. लोकशाहीमध्ये मतदान हा लोकांचा अधिकार आहे. त्यांचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर राखला गेला पाहिजे.
– जेसिंडा आर्डेम, पंतप्रधान न्यूझिलंड