न्यूयॉर्क : जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 57 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका मॉडर्ना कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे 10 कोटी डोस खरेदी करणार आहे. यासाठीचा करार कंपनीसोबत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिकेतील सरकारने कोरोना लसीचे 10 कोटी अतिरिक्त लस खरेदी करणार असल्याची माहिती मॉर्डन कंपनीने दिली आहे. यासाठी सरकारकडून 1.65 बिलियन डॉलरचा करार केला आहे. याआधी अमेरिका सरकारने ऑगस्ट महिन्यात मॉर्डन कंपनीसोबत 10 कोटी डोस तयार करण्याचा करार केला होता. त्यासाठी 1.5 बिलियन अमेरिकी डॉलरचा करार केला होता.
यानुसार आतापर्यंत अमेरिकेकडून मॉर्डन कंपनीच्या कोरोना लसीच्या 20 कोटी डोसच्या खरेदीसाठी करार केला आहे. याद्वारे अमेरिका देशातील 10 कोटी जनतेला कोरोना लसीचे दोन डोस देऊ शकणार आहे. दरम्यान मॉर्डन कंपनीद्वारे अमेरिकेला ही नवी ऑर्डर 2021 पर्यंत दिली जाईल.
या करारनंतर अमेरिकेचे आरोग्यमंत्री एलेक्स अजार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला जून 2021 पर्यंत मॉर्डन कंपनीकडून अतिरिक्त 10 कोटी कोरोना लसीचे डोस मिळतील. ज्यामुळे अमेरिकेतील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाईल. तसेच अमेरिकेतील सरकारने सहा वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे. ज्याद्वारे देशभरातील जनतेला कोरोना लस दिली जाईल.