अमेरिकेचा चीनला पुन्हा दणका! शाओमीसह 9 चिनी कंपन्यांना केले ‘ब्लॅकलिस्ट’

हॉंगकॉंग – अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एका चीनला दणका देत मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेने चीनविरोधात मोठा निर्णय घेत, 9 कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे. ज्यामध्ये आघाडीच्या कंपन्या आहेत. त्यात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीसह 9 कंपन्या आहेत.

या निर्णयानंतर अमेरिकी इन्व्हेस्टर्सला या कंपन्यांमधून आपली गुंतवणुक बाहेर काढावी लागणार आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा वेळ आहे. यापूर्वी अमेरिकेने चिनी कंपनी हुदाई आणि ZTE सोबतही असे केले आहे.

शाओमीशिवाय बॅन होणाऱ्या कंपन्यांमध्ये चीनची प्लेन निर्माता कंपनी कोमॅम, तेल प्रॉडक्‍शन कंपनी सीएनओओसी ही सामिल आहे. सीएनओओसी ही चीनची सर्वात मोठी सरकारी ऑईल कंपनी आहे.

दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त पाण्यात सीएनओओसी ऑफशोअर ड्रिलिंगमध्ये भाग घेत आहे. यामुळे व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई, तैवान आणि मलेशियासह इतर देशांशी प्रादेशिक सीमांचे उल्लंघन होत आहे, असे अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
याबाबत अमेरिकेने सांगितले की, या कंपन्यांमुळे देशाच्या सुरक्षेततेला धोका आहे. त्यामुळेच या चिनी कंपन्या अमेरिकेत बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये अमेरिकी सरकारने 60 चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले होते.

चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी, सीएनओओसी, एविएशन, एयरोस्पेस, टेलिकम्युनिकेशन, कंस्ट्रक्‍शन क्षेत्राशी निगडीत आहेत. सरकारने शाओमी कंपनीला कम्यूनिस्ट चायनीज मिलिट्री कंपनी म्हणून लेबल केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.