चीनच्या चार कंपन्यांच्या माल आयातीवर अमेरिकेची बंदी

वॉशिंग्टन – चीनच्या उत्तर पश्‍चिमेकडील चार कंपन्यांच्या मालाच्या आयातीला अमेरिकेने बंदी घातली आहे. या कंपनीत वांशिक अल्पसंख्याक मजुरांकडून सक्तीने मजुरी करून उत्पादन केले जात असल्याचे कारण देऊन अमेरिकेने ही बंदी लागू केली आहे. 

कापूस, तयार कपडे, संगणकाचे सुटे भागृ असा माल या कंपन्यांकडून अमेरिकेला निर्यात केला जात होता. तो माल जहाजांमध्ये भरण्याचे काम सुरू असतानाच अमेरिकेने त्यांची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

चीनने त्या प्रांतातील वाशिंक अल्पसंख्याकांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करून त्यांना सक्‍तीने या कंपन्यांच्या कामाला लावले आहे. त्यांना कोणतीही मजुरी न देता अन्यायी पद्धतीने त्यांच्याकडून हे काम करून घेतले जात असल्याने त्यांचा माल आम्हाला खरेदी करता येणार नाही, अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. 

चीनने या चार कंपन्यांमध्ये व्यवसाय प्रशिक्षण दिले जात असल्याचे भासवले होते प्रत्यक्षात तिथे या कैद केलेल्यांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. धार्मिक अल्पसंख्याकांना चीनमध्ये अत्यंत हीन वागणूक दिली जात असून त्यांच्यावर अनेक प्रकाराचे अत्याचारही केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.