पाकिस्तानला एफ 16 लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मान्यता

वॉशिंग्टन – पाकिस्तानला कोणतीही सुरक्षा विषयक मदत द्यायची नाही असा ट्रम्प प्रशासनाचा आदेश अद्यापही लागू असताना अमेरिकेने पाकला एफ 16 ही लढाऊ विमाने विकण्याचा निर्णय घेतला आहे. पेंटॅगॉनने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हा व्यवहार 125 दशलक्ष डॉलर्सचा आहे.

आम्ही पाकला एक विशेष बाब म्हणून ही लढाऊ विमाने देत आहोत. याचा अर्थ आमचा त्यांच्यावर लागू असलेला सुरक्षा विषयक मदतीच्या बंदीचा निर्णय अद्यापही कायम आहे असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तथापी दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्याला अधिक वाव देण्यासाठी या विमान विक्रीला मात्र मान्यता देण्यात येत आहे. ही विमाने त्यांना दिली तरी त्याचा वापर त्यांच्याकडून कसा होणार आहे यावर अमेरिकेचे चोविस तास लक्ष राहणार आहे. तशी मॉनिटरिंग व्यवस्थाही प्रस्थापित केली जात आहे असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

या विमान विक्रीसाठी आवश्‍यक असणारे सर्टिफिकेट पेंटॅगॉनने जारी केले आहे. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या विरोधात हे विमान वापरले होते. त्यामुळे या विमानाच्या विक्री कराराविषयी वाद निर्माण झाला होता. अमेरिकेने पाकिस्तानला ही विमाने देऊ नयेत अशी भारताची आग्रही सुचना होती. पण या सुचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)