नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील तणाव हा दिवसेंदिवस वाढतंच आहे. त्यात दोन्ही देशांनी आपापल्या नियंत्रण रेषेवर आपले सैन्य तैनात केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. अशातच चीनबरोबरच्या सीमातणावाच्या बाबतीत अमेरिका नेहमीच भारताबरोबर असल्याचे अमेरिकेच्या माजी प्रिंसिपल डिप्टी असिस्टेंट सेक्रेटरी एलिस जी वेल्स यांनी म्हंटले आहे.
एलिस जी वेल्स म्हणाल्या कि, भारताच्या सार्वभौमत्वविरूद्ध चीनकडून होत असलेला हल्ला रोखण्यासाठी अमेरिका भारताबरोबर आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. सोबतच #USindia dosti #india असे हॅशटॅगही वापरले आहेत.
External rebalancing is critical. At the end of the day, it will be the US that stands with India in pushing back against constant Chinese probing of Indian sovereignty. #USindia dosti #india https://t.co/FJki4dKW33
— Alice G Wells (@AliceGWells) June 13, 2020
दरम्यान, भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने आल्याने दोन्ही देशांत तीन आठवड्यांपासून सीमेवर तणाव निर्माण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीनमधील सीमा वादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, हा प्रस्ताव भारताने सावध प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे नाकारला. सध्या तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पहिल्या फेरीत चीनने २ ते .५ किलोमीटर मागे हटण्यास सहमती दर्शवली आहे.