अभिनेत्री उर्वशी रौतेला भलेही चित्रपटांमध्ये फारशी झळकत नसली तरी ती खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढत असल्याचा पुरावा आहे.
अलीकडेच उर्वशीला इंस्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्स मिळाले आणि तिने बोल्ड फोटो पोस्ट करून हा आनंद साजरा केला.
उर्वशीने पोस्ट केलेला फोटो हा समुद्रकिनारी असून यात तिने बिकिनी घातलेली आहे. या सुंदर अशा फोटोत ती हातात ज्यूसचा ग्लास घेवून आपला आनंद व्यक्त करताना दिसते.
तसेच इंस्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स झाल्याबद्दल तिने सर्वांचे आभारही मानले आहे. उर्वशी ही सतत आपले हॉट फोटो पोस्ट करत असल्याने दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे.
तसेच जगासह देशातही करोना व्हायरसने कहर केलेला असल्याने भारतात लॉकडाउन सुरू आहे. यामुळे सर्व सेलिब्रिटीजसह चाहतेही घरातच बसून आहे. अशा या वातावरणात चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी उर्वशी तिच्या ग्लॅमरस अशा फोटोंनी सर्वांना घायाळ करत आहे.