उर्वशी रौतेला बऱ्याच दिवसांनंतर चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीपासून तिचे नाव क्रिकेटपटू हार्दिक पांड्याबरोबर जोडले जात होते. काही दिवसांपूर्वी तिच्याबरोबर एक गोंडस कुत्र्याचे पिल्लूही दिसले होते. हे पिल्लू तिला हार्दिक पांड्याने गिफ्ट दिले होते, असे समजते आहे.
मात्र आता उर्वशीने या रिलेशनशीपबाबतचे मौन सोडले आहे. एका इंटरव्ह्यूदरम्यान तिने आपली भूमिका स्पष्ट केली. हार्दिकबरोबर आपले काहीही अफेअर नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर आपले नाव जोडले जायला नको, असे ती म्हणाली.
या संदर्भात तिने हार्दिक पांड्याला चक्क ताकिदही दिली आहे. हार्दिकने सध्या आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावे. रिलेशनशीपबाबतच्या चर्चा एन्जॉय करू नये, असेही ती म्हणाली. स्वतःबाबत बोलताना तिने आपले कोणाबरोबरही अफेअर नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपले लक्ष पूर्णपणे आपल्या करिअरवर केंद्रीत आहे, हे देखील तिने सांगितले.
2018 मध्ये उर्वशी आणि हार्दिक पांड्या एका पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर उर्वशीने इन्स्टाग्रामवर हार्दिकबरोबरचा एक फोटोही शेअर केला होता. तेंव्हापासूनच या दोघांबाबतची चर्चा रंगायला लागली होती. मात्र आता ही चर्चा थांबेल, असे वाटते.