इथे दिसत असलेल्या या एकाच फोटोमुळे उर्वशी रौतेला विशेष चर्चेत आली आहे. मड बाथ करतानाचे तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. उर्वशी रौतेलानं आपल्या अनोख्या व्यक्तिमत्त्वानं इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल आणि स्टाइलिश अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश आहे.
उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय अभिनेत्री आहे. उर्वशी रौतेलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मड बाथ करताना दिसली आहे, आणि आता तिचा हा फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. फोटोवर चाहते खूप कमेंट करत आहेत.
https://www.instagram.com/p/CQGKKljh-dK/?utm_source=ig_web_copy_link
हा फोटो शेअर करताना तिने म्हटले आहे की, ग्रीक महाराणी क्लिओपात्रा मडबाथच्या प्रेमात होती. तसेच ग्रीक सौंदर्य देवता व्हिनसनेही अनेकदा मडबाथ घेतल्याचे उल्लेख आढळतात. बालेरिक बीचवरील रेड मड आपण अंगावर लेपला असल्याचेही तुने सांगितले आहे. त्वचेचे सौंदर्य अबाधित राखायचे असेल, तर त्यासाठी अन्य कोणत्याही कॉस्मेटीक्सपेक्षा मडबाथ सर्वात फायदेशीर असल्याचा दावा आपल्याला मान्य असल्यावेही उर्वशीने सांगितले आहे.
या फोटोत तिनं चिकणमातीचा लेप ठेवला आहे. हे फोटो शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. एका नेटकऱ्यानं लिहिलं तुम्ही अनिल कपूरचा नायक चित्रपट पाहिला आहे का?’ दुसरीकडे, दुसऱ्यानं लिहिलं “इतक्या पैशाचा उपयोग काय आहे?’
उर्वशी रौतेला नुकतंच अरब सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत ‘वर्साचे बेबी’मध्येही दिसली आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आता ती रणदीप हूडासोबत जिओ स्टुडिओच्या आगामी वेब सीरिज “इन्स्पेक्टर अविनाश” मध्ये दिसणार आहे. लवकरच ती तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. हा मोठा बजेट चित्रपट असणार आहे, अशी माहिती मिळाली आहे की, उर्वशी आयआयटीएन आणि मायक्रोबायोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.