हल्ली उर्वशी रौतेला पंजाबमधील प्रसिद्ध गायक गुरू रंधवाबरोबर खूप एन्जॉय करताना सोशल मीडियावर दिसते आहे. या दोघांचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट झाला आहे. त्यामध्ये हे दोघेही समुद्राच्या पाण्यामध्ये खूप मस्ती करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
उर्वशीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कधी गुरू रंधवा पाण्यातच पुश अप्स मारताना दिसतो, तर कधी उर्वशी त्याच्या अंगावर पाणी उडवताना दिसते. त्याचवेळी पाण्याच्या जोरदार लाटांमुळे उर्वशीचा तोल जातो आणि धडामकन पाण्यात पडते. गुरू रंधवा तिचा एक हात धरून तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही उर्वशीला आपला तोल सांभाळता आलेला नाही. किनाऱ्यावर रेमो डिसोझाही उभा आहे आणि तो या दोघांवर कॉमेंटही करत आहे.
View this post on Instagram
उर्वशी आणि गुरू रंधवाचा “बेहद रोमॅंटिक’ हा म्युझिक अल्बम आजच रिलीज झाला. या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी हे दोघे सध्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहेत. सध्या सीरियल अथवा अन्य कोणत्याही सिनेमातल्या रोलमध्ये सक्रिय नसल्याने उर्वशीला या म्युझिक व्हिडिओसाठी वेळ देणे शक्य झाले आहे.