मुंबई – उर्वशी रौतेला आणि फॅशन हे समीकरण नेहमीच चर्चेत असत. म्हणूनच चाहते नेहमी उर्वशीच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतीच अभिनेत्री मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान तिचे बरेच फोटो मीडियाने क्लिक केले, जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत. उर्वशीचे हे लेटेस्ट फोटो चाहत्यांना चांगलीच भुरळ घालत आहेत.
या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्वशी ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत होती. उर्वशीचा हा लूक पाहिल्यानंतर काही सोशल मीडिया यूजर्स तिची बुद्धिबळ खेळाशी तुलना करत आहेत आणि उर्वशीवर बुद्धिबळ खेळता येईल, असे देखील म्हणत आहेत. उर्वशीने परिधान केलेला ड्रेस चेसच्या बोर्डप्रमाणे असल्यामुळे अनेकांनी उर्वशीच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव केला आहे.
उर्वशीच्या या ड्रेसबद्दल सांगायचे तर, यावेळी तिने ब्रॅलेट आणि ट्राउझर्स परिधान केलेली दिसली. अभिनेत्रीने काळ्या हिलने तिचा लूक पूर्ण केला. यासोबतच या लुकमध्ये सोनेरी केसही सौंदर्यात भर पाडत आहेत. उर्वशीच्या मेक-अपबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने गुलाबी मेकअप केला होता ज्यामध्ये तिचा रिफ्रेशिंग लुक चाहत्यांच्या नजरेतून सुटण्याचे नाव घेत नाही.
अनेकांनी उर्वशीच्या या अतरंगी स्टाइलवर कमेंटचा भडीमार केला आहे. कोणी तिच्या ड्रेसवर चेस खेळता येईल असं म्हंटल तर कोणी तिला चक्क झेब्राची उपमा दिल्याचे दिसून आले. फॅन्सने दिलेल्या अतरंगी कमेंटपाहून उर्वशीलाही हे ट्रोलिंग आवडल्याचे दिसून येते.