बॉलिवूडमधील बहुतेक सर्व सेलेब्रिटी खूपच सुरक्षितता पाळत आहे आणि आवश्यकतेशिवाय बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. मग देशभरात सर्व काही बंद असल्यावर, सेलिब्रिटी घरीच राहण्याचा नवीन सल्ला पाळत असताना ते तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी काय करतात? सर्वप्रथम, ते सर्व सावधगिरीचे पालन करतात आणि दुसरे म्हणजे, ते त्यांच्या शरीराची इम्यून सिस्टिम वाढवण्याचा प्रयत्न करतात.
कोरोना अधिकृतपणे “सार्स – कॉव्ही – २” ने संभोदले जात आहे. जवळपासाच्या माणसाकडून आपणास वायरस पसरण्याचा भीतीने भारताच्या नागरिकांना काळजी लागली आहे, म्हणून सर्व गर्दीत जाणं टाळत आहे आणि घरीच थांबत आहे.
या आजाराचा फैलाव टाळण्यासाठी व्यायामशाळा तात्पुरती बंद झाल्याने केटरिना कैफ, मलायका अरोरा, जॅकलिन फर्नांडिज, उर्वशी राउटेला आणि इतर बर्याच अभिनेत्री घरात कसरत करत आहे आणि आपल्या चाहत्यांनाही हे कसे करावे हे शिकवण्यास सुरुवात केली आहे. सुंदर अभिनेत्री उर्वशी रौटेला आपल्या सोशिअल हॅन्डल वर आणि आपल्या चाहत्यांना कसरत कशी करायची व स्ट्रेचिंग करण्याचे विडिओ पोस्ट केले आहे. विडिओ मध्ये अभिनेत्री खूप सुंदर पद्धतीने हेडस्टँड करत आहे आणि भिंतीच्या मदतीने कार्टवील मारताना दिसत आहे. तिला सहजतेने योगासना नियमित करतांना पाहिले जाऊ शकते ज्यासाठी उच्च लवचिकता आवश्यक आहे. पोझला बॅक वॉकओव्हर म्हणतात असे तिने कॅप्शन मध्ये लिहिली आहे.
योग आणि शारीरिक क्रिया करण्यासाठी आपन खुर्ची, सोफाचा आधार घेऊन शकतो, घरात बसल्या बसल्या स्क्वाट्स, पुशअप्स, ट्रायसेप डिप्स इत्यादी व्यायाम करू शकतात. अश्या परिस्तितीत घरचे आपले इम्यून सिस्टिमला चांगला ठेवण्यासाठी फळे, पाले भाज्या आणि ज्यूस पिऊन स्वतःला तंदरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.
Instagram Link: https://www.instagram.com/p/B95-4qRgNfo/