उर्वशी रौतेलाने दिले आपल्या सोलमेटचे संकेत

उर्वशी रौतेलाने आपल्या कष्टाने बॉलीवूडमधील आपले स्थान पक्के केले आहे. डान्स स्कील आणि अभिनयाच्या जोरावर ती सध्या खूप बिझी आहे. सतत चालणाऱ्या शूटिंगमधून वेळ काढून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

ती तऱ्हेवाईक फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच सोशल मीडियावर भविष्याशी संबंधित फिल्टरवर लोक फोर खोळंबतात, असे तिच्या लक्षात आल्यामुळे तिने जरा गंमत करायचे ठरवले.

आपल्या सोलमेटच्या नावाचे पहिले अक्षर काय असेल, हे जाणण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरील एका फिल्टरचा उपयोग केला. हा व्हिडिओदेखील तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. “माझ्या सोलमेटचे नाव व्ही. डब्लू. वाय किंवा के पासून सुरू होणारे असेल का?” असा प्रश्‍नही तिने उपस्थित केला आहे.

याचा अर्थ या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या नावाच्या कोणा व्यक्तीची अपेक्षा उर्वशीला नक्की असणार. आता या नावांच्या अनेक व्यक्तींपैकी कोणाशी उर्वशीचे नाते जुळते का, याचा विचार तिचे फॅन्स करायला लागले आहेत.

सध्या एका ऍक्‍शन फिल्मच्या शूटिंगसाठी उर्वशी नेदरलॅन्डला गेली आहे. याशिवाय ती आता तमिळ सिनेमातही पदार्पण करणार आहे. याशिवाय रणदीप हुडाबरोबर ती “इन्सपेक्‍टर अविनाश’ या वेबसिरीजमध्येही काम करते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.