मुंबई – उर्वशी रौतेला आपल्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. तिची हटके स्टाईल चाहत्यांना नेहमीच भुरळ घालते. नुकतंच उर्वशीने आपल्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे अनेकांची झोप उपदवी आहे. उर्वशीचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताहेत.
उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबत तिने घातलेले स्टायलिश कानातले तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. पूर्ण लूकबद्दल बोलायचे झाले तर उर्वशी रौतेलाने ग्लॉसी मेकअप केला आहे आणि ती या लूकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.
उर्वशी रौतेलाचा हा फोटो खूपच हॉट आहे असं तिच्या अनेक चाहत्यांचा म्हणणं आहे. या पोस्टला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. काही तासांत लाखो लाईक्स आले आहेत. चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्वशीच्या या फोटोवर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनीही चाहत्यांसह कमेंट्स केल्या आहेत.
उर्वशीच्या वर्कबद्दल बोलायचे झाले तर, सध्या उर्वशी तिच्या आगामी ‘द लीजेंड’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती अभिनेता सरवाननसोबत सोबत दिसणार आहे. उर्वशीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे.