बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला लॉकडाऊनमध्येही सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे सातत्याने मनोरंजन करीत आहे, पण आता उर्वशीचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. उर्वशीने स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे.
या ट्विटमध्ये उर्वशी रौतेला म्हणाली, माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. कृपया कोणत्याही संदेशाला किंवा पोस्टला प्रत्युत्तर देऊ नका. कारण मी किंवा माझ्या टीमने तो संदेश किंवा पोस्ट केलेली नाही. तसेच याची तक्रार मुंबई पोलिसांकडेही करण्यात आली आहे, असे तिने सांगितले.
उर्वशी रौतेलाच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत ट्विट केले की, आम्ही तुमची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे. दरम्यान, यापूर्वीही 2017 मध्ये उर्वशीचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यावेळी तिने फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना कळवले होते. वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास उर्वशी रौतेला लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या “थिरुट्टू पेले-2′ या तमिळ चित्रपटाचा रीमेक आहे.