थिरुट्‌टू पेले-2’च्या हिंदी रीमेकमध्ये उर्वशी रौतेला

“थिरुट्‌टू पेले-2′ हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन सुसी गणेशन यांनी केले होते. या चित्रपटात बॉबी सिम्हा, प्रसन्ना आणि अमला पॉल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या हिंदी रीमेकची शूटिंग वाराणसी आणि लखनौ येथे करण्यात येणार आहे. यात उर्वशी रौतेला आणि विनीत कुमार सिंह यांचा रोमांस पाहण्यास मिळणार आहे. 

या हिट चित्रपटाच्या हिंदी रीमेक डबिंगचे काम उर्वशी रौतेलाने सुरू केले आहे. अनलॉकनंतर काही निर्बधांसह शूटिंगला सुरुवात झाली असून या चित्रपटाकडून उर्वशीला खूप आशा आहेत. या चित्रपटात उर्वशीचा ग्लॅमर आणि देशी अशा दोन्ही लूक चाहत्यांना अनुभवण्यास मिळणार आहे. दरम्यान, उर्वशी रौतेलाने हैदराबाद येथे “ब्लॅक रोज’चे नुकतचे शूटिंग पूर्ण केले आहे.

 याचे दिग्दर्शन संपत नंदी यांनी केले आहे. यापूर्वी तिने एका कन्नड चित्रपटातही दमदार भूमिका साकारली होती. ती अखेरच्या वेळी “वर्जिन भानुप्रिया’ या कॉमेडी ड्रामा चित्रपटात झळकली होती. यात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरण सिंह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.  

Leave A Reply

Your email address will not be published.