उर्वशी शिकतेय मार्शल आर्ट

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही चित्रपट इंडस्ट्रीमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या उर्वशी ही ऍक्‍शन मोडमध्ये असून ती आपल्या आगामी चित्रपटासाठी मार्शल आर्टचे धडे गिरवित आहे. उर्वशी रौतेला ही आपल्या आगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. उर्वशी म्हणाली, मार्शल आर्ट ही खूपच मजेशीर आहे. 

मी ऍक्‍शन चित्रपटासाठी सध्या कठोर परिश्रम करत आहे आणि एक नवीन कौशल्य शिकण्यासाठी उत्सुक आहे. मग ते मय थाई, काली, फिलिपोनी स्टिक फायटिंग किंवा बोजुत्सु असो. माझ्यासाठी, हे शाळेसारखेच आहे. 

 

उर्वशीने सांगितले की, मार्शल आर्टदेखील खूपच गंमतीशीर आहे. हे सर्व नृत्यासारखे कोरियोग्राफ करण्यात आले आहे, जे खूपच सुंदर आहे. कारण मार्शल आर्टमधील किक, फ्लिप आणि उत्कृष्ट पैलूंसह अतिशय तरल आहे.

 

 दरम्यान, उर्वशीने आपल्या आगामी ऍक्‍शन चित्रपटासंदर्भात अधिक माहिती शेअर केली नाही. तसेच उर्वशी लवकरच एका तमिळ चित्रपटात झळकणार आहे. यात तिने एका मायक्रोबायोलॉजिस्टची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती “ब्लॅक रोज’, “थिरुतु पायल-2’च्या हिंदी रीमेक आणि “इन्स्पेक्‍टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये काम करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.