बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या तब्बल 3 कोटींच्या पार गेली आहे. या कामगिरीबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानत एक नोट पोस्ट केली असून याचे सेलिब्रेशन करणारा एक कोलाज व्हिडीओही पोस्ट केला आहे.
उर्वशीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, इन्स्टाग्रामवरील 3 कोटी फॉलोअर्सचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा. माझ्या जीवनातील एक हिस्सा बनत आनंदात सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. या सर्व आठवणी माझ्या सदैव स्मरणात राहतील.
उर्वशी आपल्या चाहत्यांबद्दल म्हणाली, माझ्या यशात आपले खूप मोठे योगदान आहे. आपण दिलेले प्रेम, सहकार्य आणि पाठिंब्यामुळेच मी आजपर्यंतची वाटचाल पूर्ण करू शकली आहे. यासाठी सर्व चाहत्यांचे खूप-खूप धन्यवाद. दरम्यान, उर्वशीने फॉलोअर्सच्या संख्येत बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (2.21 कोटी) आणि शाहरुख खान (2.24 कोटी) यांनाही मागे टाकले आहे.
View this post on Instagram
NAMASLAY 🖤🤍 . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love #UrvashiRautela
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास उर्वशी रौतेला आपल्या पहिला तेलुगू चित्रपट “ब्लॅक रोज’च्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे. याचे चित्रीकरण हैदराबाद येथे करण्यात येणार आहे.