मुंबई – टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने कोमोलिका बनून असा कहर केला की तिची भूमिका आजही लक्षात राहते. उर्वशी ढोलकियाला अनेकजण तिच्या कोमोलिका नावानेच ओळखतात. उर्वशीने हे पात्र इतक्या प्रामाणिकपणे साकारले की अनेक लोक उर्वशीला खऱ्या आयुष्यातही या पात्रा सारखेच मानू लागले.
खऱ्या आयुष्यातही लोक उर्वशीला कोमोलिका समजायचे.
उर्वशीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ‘कसौटी जिंदगी की’ या शोमध्ये नकारात्मक भूमिका केल्यानंतर कोणीही माझ्या जवळ येण्याचे टाळत होते. उर्वशीने सांगितले की, वयाच्या 17 व्या वर्षी तिच्या दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. जेव्हा माझी मुले मोठी होऊ लागली तेव्हा मी पुन्हा कामावर गेली. अशा परिस्थितीत लोक माझ्या टीव्ही पात्राला खऱ्या आयुष्याशी जोडू लागले.
उर्वशी पुढे म्हणाली, जेव्हा माझी मुले मोठी होऊ लागली आणि मी कामावर परतले तेव्हा मला असे व्यक्तिरेखा मिळाले की कोणीही जवळपास फिरकत नव्हते. शोमध्ये ते पात्र साकारल्यानंतर मला कोणाकडूनही ऑफर आली नाही. प्रत्येकजण मला त्या पात्राशी जोडू लागला, पण मला त्यात काही अडचण नव्हती.
जेव्हा एकता कपूरने मला कमोलिकाच्या भूमिकेसाठी कास्ट केले होते, तेव्हा एकता कपूरने मला सांगितले की ती टीव्हीवरचा पुढचा सेक्स बॉम्ब असेल. एकताच्या या कमेंटवर मी हसायलाच लागली. माझ्या मनात असे काही नव्हते. मला फक्त चांगलं काम करायचं होतं.
उर्वशीने आयुष्यातील ३८ वर्षे इंडस्ट्रीत घालवली आहेत. तिने अनेक लोकप्रिय शोमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. उर्वशी टीव्हीच्या सर्वात मोठ्या शो बिग बॉसची विजेती देखील आहे.अभिनेत्री सध्या नागिन 6 मध्ये दिसत आहे.