हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान ; उर्मिला मातोंडकर अडचणीत

मुंबई – बॉलीवूडमधील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतल्या नंतर कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात केलेले वक्तव्य उर्मिला मातोंडकरला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.

हिंदू धर्म हा जगातील सर्वाधिक धोकादायक धर्म झाला असल्याचे वक्तव्य, उर्मिला मातोंडकरने प्रचारादरम्यान केले होते. त्यामुळे उर्मिलाच्या या वक्तव्यावर मुबईचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी तक्रार दाखल केली असून, या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा देखील उल्लेख केला आहे. उर्मिला मातोंडकरच्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचे नखुआ यांनी तक्रारीत म्हंटले आहे. मुंबईच्या पवई पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.