‘त्या’ टीकेवर उर्मिलाने दिले सणसणीत उत्तर

मुंबई –  ‘उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी ना? जर तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही?’  उर्मिला मातोंडकरने मांडलेल्या थेट मतावर कंगना रणौतने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  अत्यंत खालच्या पातळीवरची  टीका केली आहे.

कंगनाच्या या  टीकेनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यातून तिने कंगनाला तिचे  नाव न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न केला असावा असे दिसते आहे. ‘जय महाराष्ट्र, जय हिंद, शुभ रात्री’ अशी कॅप्शन देत उर्मिलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला आहे.   या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘सूड माणसाला जाळत असतो, संयमच सुडावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय असतो.’

Leave A Reply

Your email address will not be published.