मुंबई – उर्फी जावेदसाठी तिच्या फॅशनमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे ही काही नवीन गोष्ट नाही. फॅशन सेन्सेशन बनलेली उर्फी नेहमीच तिच्या रंगीबेरंगी आणि अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या हटके लूक मधील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
आणि त्यामुळेच अनेकदा ती नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील होत असते. नुकतंच उर्फीचा नवीन लूक समोर आला असून, यामध्ये तिने चक्क केसांपासून बनवलेला टॉप परिधान केला असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
फिकट निळ्या रंगाच्या टॉपला तिने लांब हेअर एक्स्टेशन्स लावले होते. यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट्स येत आहेत. काहींनी तिला या विचित्र ड्रेसबद्दल ट्रोल केलंय, तर काहींनी भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत.
तिचा हा हटके ड्रेस पाहून अनेकांच्या तर भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर उर्फीचा मोठा फॅनफॉलोईंग आहे. शिवाय पापाराझी अकाऊंटवर तिचे दररोज नवीन व्हिडीओ पोस्ट केले जातात.