मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील ट्विटरवॉर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. उर्फी जावेद खूपच तोकडे कपडे घालते, त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी उर्फीच थोबाड फोडण्याचं वक्तव्यही त्यांनी केले होते. दरम्यान, वाघ यांच्या वक्त्तव्यांना उर्फी जावेदने सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळत आहे.
उर्फी ट्विटरवरून सातत्याने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत आहे. ती फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये चित्रा वाघ यांचा उल्लेख करताना दिसून येत आहे. सोमवारी तिने “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असे उर्फीने म्हटले होते. त्यानंतर तिने आणखी एक ट्वीट केले आहे.
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
या ट्वीटमध्ये तिने चारोळी टाकली आहे. “उर्फी की अंडविअर मे छेद है, चित्रा ताई ग्रेट है,” असे ट्वीट तिने केले आहे. त्यात स्वतःच्याच अंतर्वस्त्राचा उल्लेख करत तिने चित्रा वाघ महान असल्याचे म्हटले आहे. त्यावर तिने तीन रेड हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत.
Uorfi ki underwear me chhed hai ,
Chitra tai great hai ❤️❤️— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
दरम्यान, मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांचा वाद सुरू आहे. या वादावर अमृता फडणवीसांपासून ते अनेक राजकारण्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.