नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) २०१८ नागरी सेवा परीक्षेचा निकाल लागला असून महाराष्ट्रातील सृष्टी देशमुख हीने बाजी मारत राज्यात प्रथम तर देशात पाचवा क्रमांक मिळवला आहे. कनिष्क कटारिया याने देशात प्रथम क्रमांक मिळवला.
महाराष्ट्रातील पहिले पाच –
- सृष्टी देशमुख (AIR-५)
- तृप्ती धोडमिसे (AIR-१६)
- वैभव गोंदणे (AIR-२५)
- मनीषा आव्हाळे (AIR-३३)
- हेमंत पाटील (AIR-३९)